भूमिका राकेश लखन. राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा
प्रसंग आहे अकोल्याचा.....
* राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा
*पि.सी.एम.सी. मधील पिंपळे गुरूव मधील खेळाडू
भूमिका राकेश लखन.
* वडील गरीब आणि अपंग
* सर्व परस्थितीवर मात करून राज्यस्तरीय
स्पर्धेत सुवर्णपदक विजेती झाली, आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी
पात्र झाली. * वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेसाठी जाण्यासाठी "आर्थिक चणचण आणि कोणाची मदत नाही.
आता विषय असा आहे. राज्यभर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये असे खूप विद्यार्थी आहेत. ज्यांना खरच आर्थिक अडचण आहे, मदतीची गरज आहे. शासन त्यांच्या लेवल वर कार्य करीत आहे. क्रीडा असोसिएशन त्यांच्या लेवलवर कार्य करीत आहे.
यण प्रत्येक क्रीडाप्रेमींनी असा विचार करण्याची वेळ आली आहे की मी अशा खेळाडूंसाठी काय करू शकतो.
समाजातील आर्थिक उन्नत असलेल्या लोकांनी, संस्थांनी, कंपन्यांनी पुढे येण्याची वेळ आली आहे.
Comments
Post a Comment