पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, वाकड पोलीस स्टेशन आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रम

8 मार्च 2022 (मंगळवार).

स्थळ - प्रेस्टिज हॉल, वाकड, पिंपरी चिंचवड. येथे पार पडला.


त्यात मुली व महिलांना विनाशस्त्र स्वतः चे रक्षण कसे करावे याचे खास प्रशिक्षण देण्यात आले.


सदर प्रसंगी IPS कृष्णप्रकाश सर (पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय), मा. संजय शिंदे सर (अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) मा. आनंद भोईटे सर (पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2) मा. श्रीकांत डिसले सर (सहाय्यक पोलीस आयुक्त), मा. विवेक मुगळीकर सर (वरिष्ठ पोलीस निरीक्षण, वाकड पोलीस स्टेशन) मा. बाळकृष्ण सावंत सर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजेवाडी पोलीस स्टेशन) मा. सुनील टोनपे सर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस स्टेशन) तसेच पोलीस अधिकारी व ठाणे अंमलदार उपस्थित होते.

मुलींना स्वरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी अरविंद मोरे सर, लेखा लोखंडे मॅम, शुभ्राता वाघमारे मॅडम, अनुश्री गायकवाड मॅडम, अश्विनी फडतरे मॅडम, वेदांती करडीले मॅडम, अनुष्का साळे मॅडम, धनश्री कोळी मॅडम यांनी प्रशिक्षक म्हणून काम पहिल्याबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा. कृष्णप्रकाश सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी महिला दिनानिमित्त पदमश्री सौ. राहिबाई पोपेरे, प्रिया मराठे (मराठी अभिनेत्री, डॉ. राणी खेडकर (बाल मानसशास्त्र तज्ञ) यांचा व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

विशेष सत्कार गार्गी अरविंद मोरे कुडो मार्शल आर्ट मध्ये इंटरनॅशनल पातळी वरील प्रविण्य मिळविल्या बद्दल पिंपरी पोलीस आयुक्तालय मार्फत पिंपरी चिंचवड चे सन्मानीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश सर यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

धन्यवाद

अरविंद मोरे

अध्यक्ष - पुणे जिल्हा कुडो संघटना.



Comments